Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीमहाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र धारगड भक्तांच्या दर्शनासाठी खुले

महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र धारगड भक्तांच्या दर्शनासाठी खुले

अकोला न्युज नेटवर्क दिनांक ७ मार्च २०२४ :- महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र धारगड येथे ८ मार्च रोजी श्री क्षेत्र धारगड सेवा समिती अकोट धारगडतर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फराळ वाटपाचे आयोजन केले आहे. महाशिवरात्रीनिमित्त क्षेत्र धारगड भक्तांना दर्शनासाठी परवानगी द्यावी, याबाबतचे पत्र सेवा समितीने ४ मार्च उपवनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट, वन्यजिव विभाग अकोट यांना दिले होते. वनविभागाने अटी शर्तीसह श्री क्षेत्र धारगड येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना परवानगी दिली आहे.

८ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या दर्शनाकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्रात असलेले धारगड शिवमंदिर खुले राहील. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र धारगड यात्रा सेवा समितीचे वतीने यांनी केले.

कोड; यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून खटकाली तपासणी नाका, गुल्लरघाट तपासणी नाका, टी पाॅइंट येथे वाहनाची तपासणी करण्यात येईल. तपासणीमध्ये गुटखा पुडी, प्लास्टिक पिशवी आढळून आल्यास जप्त करण्यात येईल. याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. भाविकांनी निरुपयोगी वस्तू कचरा कुंडीतच टाकून वनविभागास सहकार्य करावे. वनक्षेत्रात कुठलीही अनुचित बाब आढळल्यास किंवा पर्यावरणाला ईजा करणाऱ्या व्यक्तीवर वनसंरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येईल. याचीसुद्धा भाविकांनी दक्षता घ्यावी.

या विभागाच्या संरक्षित क्षेत्रामध्ये अथवा धारगड शिवमंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे दुकाने, टपरी भोजन, फराळ व्यवस्था करण्यास सक्त मनाई आहे. भाविकांच्या सोयीकरीता धारगड टी पाॅइंट येथे वाहनाची पार्किंगची सोय करण्यात येत आहे. तेथून पुढे मंदिराकडे पायी जाणे बंधनकारक आहे.

नियम पाळा अन्यथा होणार कारवाई
भाविकांनी मोबाईल तसेच वाहनातील टेप रिकाॅर्डरमध्ये गाणे वाजवण्यास मनाई केली आहे. कुठल्याही प्रकारचा केरकचरा प्लास्टिक बॅग पर्यावरणास नुकसानकारक आहे. अशा वस्तुचा उपयोग भाविकांकडून होणार नाही, याची दक्षता घ्यावी. भाविकांनी डफडे इ. वाजवू नये. अन्यथा वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!