अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ :- मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये अकोला मनपा क्षेत्रातील पश्चिम झोन अंतर्गत डाबकी रोड रुंदीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणा-या अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.डाबकी रोड हा अकोला शहर मंजूर विकास मोजणीनुसार 18 मीटर रूंदीचा असून आज रोजी फक्त 12 मीटरचा अस्तित्वात असून या रस्त्यावर कच्चे व पक्क्या स्वरूपाचे करण्यात आलेले अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून सदर रस्त्यावरील विद्युत पोल भुमिगत करून दोन्ही बाजुनी रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. या कारावईत अतिक्रमण विभागाचे सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, नगर रचना विभागाचे अभियंता राजेंद्र टापरे, रितेश टेकाडे तसेच अभिकर्ताचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
मनपा व्दारा पश्चिम झोन अंतर्गत डाबकी रोडवरील अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई…
RELATED ARTICLES