अकोला न्यूज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातूर दिनांक 16 फेब्रुवारी २०२४:- श्री. नानासाहेब महाराज संस्थान पातूर, जिल्हा अकोला येथे १९ रोजी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पातूर शहरातील पुरातन वास्तू असलेल्या व पातूर शहराचे आराध्य दैवत श्री. नानासाहेब मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सोमवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी नानासाहेब यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन केले आहे.सदर महाप्रसादाचा कार्यक्रम सोमवार दि.१९ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजतापासून सुरू होईल तरी पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.नानासाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे.
श्री. नानासाहेब महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन
RELATED ARTICLES