अकोला न्युज नेटवर्क दिनांक २४ जुलै :-रविवारी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणांचा पूर ओसरला असून, पीक नुकसानीच्या पाहणीला प्रारंभ झाला. मात्र शेतात पाणी साचून असून, चिखलामुळे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे तातडीने करण्याचे आव्हान सरकारी यंत्रणांपुढे उभे ठाकल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी कृषी, महसूल व जिल्हा परिषद यंत्रणाकडून संयुक्त पंचनामे होत आहेत. मात्र बाळापूर तालुक्यातील काही ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना पीक नुकसानीचे संयुक्त पंचनाम्यासाठी आदेश हवे असून, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मते मात्र तहसीलदार स्तरावरच पंचनामे नियोजन आदेश पारीत होतात. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा अंतीम अहवाल केव्हा तयार होईल आणि मदत कधी मिळेल, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.
अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा, अकोट, अकोला, मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. िवद्रुपा, मोर्णा नदीला पूर आल्याने नदीच्या काठच्या पिकांना जबर तडाखा बसला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शेतात साचले. अतिवृष्टीमुळे अंकुरलेल्या पिकांची प्रचंड हानी झाली. पाऊस थांबल्यानंतर आता शेती व पशुधन नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. कृषी, महसूल व जिल्हा परिषदेची यंत्रणा संयुक्त पंचनामे अहवाल तयार करणार असून, अहवालात अपेक्षित निधीची मागणी सरकारकडे करण्यात येईल. मात्र अद्यापही संयुक्त पंचनाम्यांबाबत स्पष्टता नाही.
अतिवृष्टी, पुरामुळे रस्ते व पुलांचे नुकसान
१) बाळापूर तालुक्यताील झुरळ खु . या गावातील पक्का रस्ता (४० फुटापर्यंतचा ) वाहून गेला. टाकळी ते निमकर्दा येथील पक्का रस्ते ५० फुट वाहून केला.
२) अकोट तालुक्यातील वारूळा ते तेल्हारा रस्त्यावरील मोहाळी नदीवरील पूल वाहून गेला.
३)तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथील पुलाजवळ २० फुटाचा खड्डा पडल्याचे रविवारी िजल्हा प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.