अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ :- सोने या आठवड्यात घसरले तर चांदी लकाकली आहे. सोन्याने या महिन्यात ग्राहकांना दिलासा दिला आहे. तर चांदीत चढउताराचे सत्र आहे. चांदी दोन आठवड्यापासून सातत्याने उसळी घेत आहे. बजेटनंतर दोन्ही धातू भरारी घेतील हा अंदाज पण फोल ठरला. चांदीला मोठी उसळी घेता आलेली नाही. गेल्या आठवड्यात सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले तर त्यात एकदाच 180 रुपयांची दरवाढ झाली होती. चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली तर एकदाच 500 रुपयांनी वधारली होती. या आठवड्याची सुरुवात चढउताराने झाली आहे. कसा आहे सोने-चांदीचा भाव.
सोन्याने दिला मोठा दिलासा
या 13 दिवसांमध्ये सोने जवळपास 830 रुपयांनी स्वस्त झाले तर त्यात 510 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात 5 फेब्रुवारीला 150 रुपयांनी तर 6 फेब्रुवारीला 220 रुपयांनी सोन्यात घसरण झाली. 7 फेब्रुवारी सोने 180 रुपयांनी महागले. 9 फेब्रुवारीला 20 तर 10 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,840 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी वधारली
या 13 दिवसात चांदी 1200 रुपयांनी महागली. तर 2 हजार रुपयांनी उतरली. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी उतरल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला किंमती जैसे थे होत्या. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. 12 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने घसरले आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 62,301 रुपये, 23 कॅरेट 62,052 रुपये, 22 कॅरेट सोने 57,067 रुपये झाले. 18 कॅरेट 46,725 रुपये, 14 कॅरेट सोने 36,446 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,140 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.