अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :- संपूर्ण जुलै महिन्यात सोने-चांदीचे भाव नरमलेले दिसत होते. मात्र या ऑगस्ट महिन्यात सोने चांदीच्या भावाने पुन्हा उच्चांक गाठला आहे. सलग दोन दिवस उतरलेल्या भावा नंतर सोन्याच्या किमतींनी झपाट्याने उसळी मारली आहे.आज (शनिवारी) बाजारात सोने चांगलेच चमकत असून सोन्याच्या किमतीत 150 रुपयानी वाढ झाल्याचे दिसत आहे. MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,820 रूपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,900 रूपयांनी व्यवहार करत आहे.
तर गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार ही सोन्याच्या किमती (Gold Price Today वाढल्या आहेत. शनिवारी गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 55,150 रूपयांनी सुरू आहे. याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,160 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोने 100 ग्रॅमने 5,51,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. जागतिक पातळीवर सोने-चांदीत (ANN NEWS) होणाऱ्या चढउतारांमुळे त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर देखील होताना दिसत आहे.सराफ बाजारात सोन्या सोबत चांदीच्या किमती देखील वाढले आहेत. शनिवारी चांदी 10 ग्रॅमने 751 रूपयांनी व्यवहार करत आहे. याचबरोबर, 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,510 रुपये सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक सणवार आले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील ग्राहकांची गर्दी देखील वाढली आहे. मात्र सोने चांदीच्या किमतीत सतत होणाऱ्या बदलांमुळे सोने नक्की कोणत्या मुहूर्तावर खरेदी करावे असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,150 रुपये
मुंबई – 55,150 रुपये
नागपूर – 55,150 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,160 रूपये
मुंबई – 60,160 रूपये
नागपूर – 60,160 रुपये