अकोला न्यूज नेटवर्क सागर भलतिलक प्रतिनिधी अकोट दिनांक ३० ऑगस्ट २०२३ :-राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात,ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 1१पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :
पीकस्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठीअर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे.
- स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहिल.
- स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसतअसणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
- पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यापिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
- पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजितकरण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधार भूत धरून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
३) ७/१२, ८-अ चा उतारा
४) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)
५) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
६) बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप- सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र स्पर्धापातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये
पहिले दुसरे तिसरे
1 तालुकापातळी 5,000 3,000 2,000
2 जिल्हापातळी 10,000 7,000 5,000
३ राज्यपातळी 50,000 40,000 30,000
खरीप हंगाम सन २०२३ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा असे आवाहन—-(जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अकोला) यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
(श्री.शंकर किरवे)
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अकोला
(AKOLA NEWS NETWORK )