Saturday, December 7, 2024
Homeब्रेकिंगबंद घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ...

बंद घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ…

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो अनुराग अभंग अकोला जिल्हा प्रतिनिधी दिनांक २९ जुलै २०२३ :- रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळीपुरा स्थित भगतसिंग चौका जवळील एका घरात मृतदेह आढळून आला हा मृतदेह अगदी सडलेल्या अवस्थेत असून सर्वत्र दुगंधी सुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मालिपुरा स्थित भगतसिंग चौकातील एका घरात वास येत असल्याने येथील नागरिकांनी रामदास पेठ पोलिसांना कळविले पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दरवाजा ढकलून आत गेले असता ऐक अंदाजे ६० ते ६५ वर्षीय इसम मृतावस्थेत पडलेला असल्याचे दिसून आले. मृतदेह संपूर्ण सडलेला असल्याने परिसरात एकच दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता ताराचंद नथालाल बुंदले वय अंदाजे ६० ते ६५ वर्ष राहणार माळीपुरा हल्ली मुक्काम देशमुख फाईल असल्याचे प्रथमदर्शनीय समजून आले.

मृतक ताराचंद नथालाल बुंदले ह्याला दारूचे व्यसन असून तो चपला बुट शिवण्याचे काम करीत असल्याची माहिती मृतकाच्या नातेवाईका कडून मिळून आली. चार दिवसा पूर्वीच मृतकाने या घराची चाबी आपल्या मुलीकडून घेतली होती मृतक हा आपल्याच कामात मग्न असून आजूबाजूच्या लोकांसोबत ज्यास्त संबंध ठेवत नसल्याने कोणी याच्याशी ज्यास्त बोलत नव्हते आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घरातून अचानक गुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता ताराचंद नथालाल बुंदले हे मरून पडलेले दिसून आले. रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. नेमका ताराचंद नथालाल बुंदले याचा मृत्यू कशाने झाला याचा तपास रामदास पेठ पोलीस करीत असून तपासा अंतीच सत्य काय ते बाहेर येईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp