अकोला न्यूज नेटवर्क सागर भलतिलक प्रतिनिधी बोर्डी. (अकोट) दिनांक १८ सप्टेंबर २०२३ :– आपल्या नवनविन उपक्रमांद्वारे नेहमी चर्चेत असलेली जि.प.ची शाळा म्हणजेच जि.प. व . प्राथ मराठी आदर्श शाळा, बोर्डी होय विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी शिक्षणा सोबतच सातत्याने नाविण्यपूर्ण अभ्यासपूरक उपक्रम या शाळेत राबविल्या जात असतात.

सद्याची कौटूंबीक परिस्थिती पाहता आई वडील नोकरी, शेती मजूरी यासाठी जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असतात त्यामुळे पाल्याची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते . शाळा सोडून घरातला जास्तीत जास्त वेळ ते आपल्या आजी आजोबांसोबत घालवित असतात . आजी – नातू हे नाते विलक्षण वेगळं असते . खऱ्या अर्थाने आजी आजोबा हे मुलांचे पहिले मित्र असतात नात्याची खरी जडण घडण तेथूनच होते.आजी आजोबांचे नाते अधोरेखीत होणे त्या नात्याची खरी ओळख व महत्व होणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याच मानसशास्त्रीय बाबी ध्यानात घेऊन आजी आजोबा दिन शाळेत साजरा करण्यात आला

यावेळी सर्वप्रथम ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन कु सविता साबळे गट साधन केंद्र प्रतिनीधी व उपस्थित मान्यवराच्या हस्ते करण्यात आले . प्रास्ताविक प्र .मु.अ उमेश चोरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व हेतू कथन केले .त्यानंतर सर्व उपस्थित आजी आजोबांची ओळख इयत्ता १ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी करवून दिली त्यामध्ये आजी आजोबांचे नाव, जन्मस्थळ त्यांची आवड, त्यांचे छंद त्यांचे विशेष कार्य व त्यांच्या स्वभावातील विद्यार्थ्यांना आवडलेली एक गोष्ट इ ची ओळख स्वतः विघार्थ्यांनी करवून दिली त्यानंतर उपस्थित सर्व आजी आजोबांचे कुमकुम तिलक लावून स्वागत करण्यात आले.यानंतर आपल्या बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळवा यासाठी आजी आजोबांचे मनोरंजनात्मक खेळ कु . रचना शर्मा व इतर सहशिक्षिका यांच्या मार्फत घेण्यात आले.

आजी आजोबांची संगित खुर्ची
या खेळ प्रकारात एकूण ६१ आजी आजोबांनी भाग घेतला .या स्पर्धेचे विजेते श्री. हरीदास अवचार ठरले.

२ .कॅच द बॉटल या शारीरिक फिटनेस व व्यायाम पुरक खेळाचे आयोजन करण्यात आले .यात सर्वानी आपला सहभाग नोदविला.यामध्ये आजी व आजोबा यांच्या जोड्या समोरा समोर उभ्या करून दिलेल्या सुचनेनुसार कृती करून अनपेक्षीतपणे केलेल्या सुचनेनुसार जमिनीवरील बॉटल उचलणे हा खेळ प्रकार घेण्यात आला . या खेळप्रकारात प्रमिला रामदास वनकर ह्या आजीबाई विजेत्या ठरल्या .
शेवटी स.अ श्री प्रभाकर नागर यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय अस्वार आनंद नांदुरकर शिवदास आढे कु मनोरमा बुंदेले कु.रुपाली सिस्कार कु माया लायबर यांनी प्रयत्न केले


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!