अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०७ ऑगस्ट २०२३ :-आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत दररोज वाढ होत असते. यामुळे याचा परिणाम स्थानिक पातळीच्या सोन्या-चांदीच्या किमतीवर देखील होत असतो. शनिवारी सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्याची पाहिल्या मिळाली होती. आज म्हणजेच, सोमवारी सोने चांदीचे भाव स्थिर दिसून आले आहेत. शनिवारनंतर यामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. MCX नुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,910 असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 61,000 रूपयांनी व्यवहार करत आहे.
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, शनिवारनंतर सोन्याच्या किमती आजही स्थिर आहेत. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 55,150 रूपयांनी सुरू आहे. याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,160 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोने 100 ग्रॅमने 5,51,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे हे सर्व भाव आठवड्याच्या पहिल्या दिवशी स्थिर आहेत. जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलानंतर एक आठवड्यानंतर सोन्याचे भाव स्थिर राहिले आहेत.
तर दुसरीकडे मौल्यवान चांदीत देखील फक्त एक रुपयांनी घसरण झाली आहे. शनिवारी सराफ बाजारात 100 ग्रॅम चांदीचा भाव 751 रुपये असा सुरू होता. मात्र आजच्या भावात एक रुपयांनी घसरण होऊन तो 750 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे हा ऑगस्ट महिना सोने चांदीच्या भावासाठी नरम दिसत आहे. आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सोने चांदीचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत सोने चांदीच्या भावात जास्त फरक दिसून येणार नाही.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,150 रुपये
मुंबई – 55,150 रुपये
नागपूर – 55,150 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,160 रूपये
मुंबई – 60,160 रूपये
नागपूर – 60,160 रुपये
(AKOLA NEWS NETWORK )