अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ३० जुलै २०२३ – Welcome 3 Update : “कंट्रोल मजनू कंट्रोल” “भगवान का दिया हुआ सबकुछ है, दौलत है शौरत है” या वेलकम मधील या डायलाॅगमुळे आणि अस्खलित विनोदामुळे लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांची जोडी तर अगदी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली.

आता लवकरच “वेलकम 3” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र आता या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसणार नाहीत. या चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरू होणार आहे. या तिसऱ्या भागात उदय , मजनूची जागा ‘मुन्नाभाई’ आणि ‘सर्किट’ घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

‘वेलकम 3’ मध्ये अर्शद वारसीबरोबरच अक्षय कुमार, परेश रावल आणि संजय दत्त देखील दिसणार आहेत. वेलकम 3 चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना संजय दत्त आणि अर्शद वारसी एकत्र पाहायला मिळणार आहेत.

‘वेलकम 3’मध्ये अर्शद वारसी आणि संजय दत्तची एन्ट्री

रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले की, ‘वेलकम’ हा फिरोज नाडियाडवालाच्या बॅनरखाली बनलेल्या 3 चित्रपटांपैकी पहिला चित्रपट असू शकतो कारण स्क्रिप्ट काही काळापूर्वी तयार झाली आहे. संजय दत्त आणि अर्शदला गँगस्टर मजनू आणि उदय शेट्टीच्या भूमिका देऊन चित्रपटाच्या कथेला नवा ट्विस्ट आणण्याचा विचार चित्रपट निर्माते करत आहेत. अर्शद वारसी आणि संजय दत्तच्या जोडीने यापूर्वीच मुन्ना आणि सर्किटच्या रूपात आपली जादू दाखवली आहे.

अनिल कपूर आणि नाना पाटेकर चित्रपटात का नाहीत?

वेलकम 3 ची संपूर्ण स्क्रिप्ट तयार असून चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. ‘हाऊसफुल 5’ आणि ‘जॉली एलएलबी 3’ पूर्ण केल्यानंतर अक्षय ‘वेलकम 3’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पण नाना पाटेकर आणि अनिल कपूर ‘वेलकम 3’चा भाग का नाहीत? तो या चित्रपटाचा भाग का नाही? या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार चित्रपटाच्या निर्मात्यासोबत अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांचे पैशावरून वाद झाल्याचे समोर आले आहे.

सध्या निर्माते फिरोज नाडियाडवाला हे ‘हेरा फेरी 3’, ‘आवारा पागल दिवाना 2’ आणि ‘वेलकम 3’ या तीन मोठ्या चित्रपटावर काम करत आहेत. नाना पाटेकर, अनिल कपूर, अक्षय कुमार, परेश रावलचा ‘वेलकम’ हा रुपेरी पडद्यावरचा सुपरहिट चित्रपट ठरला होता. दुसऱ्या भागाला फारसं यश मिळालं नव्हतं पण आता या तिसऱ्या भागासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!