Saturday, September 14, 2024
Homeब्रेकिंगबुलढाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात दुर्घटनेत १ प्रवाशी जागीच ठार...

बुलढाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात दुर्घटनेत १ प्रवाशी जागीच ठार तर १५ प्रवासी जखमी

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४:- बुलढाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; चिखली देऊळगावराजा रोडवरील चिखली तालुक्यातील रामनगर फाट्याजवळची घटना बस ड्रायव्हरचे पाय तुटले, 1 प्रवाशी जागीच ठार; 15 प्रवासी जखमी पुण्यावरून शेगावला जात होती बस! काळजाचा थरकाप उडवणारी घटना आज सकाळची ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगावर बेतला चिखली तालुक्यात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना आज सकाळी घडली आहे..चिखली ते मेरा खु दरम्यान असलेल्या रामनगर फाट्याजवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.. ट्रॅव्हलला ओव्हरटेक करण्याच्या नादात महाराष्ट्र परिवहन महामंडळाची स्लीपर कोच बस ट्रॅव्हल समोर असलेल्या ट्रकला मागून धडकली आहे.. या अपघातात एसटी बस चालकाचे पाय मोडले असून एका 25 वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर 15 ते 16 प्रवासी जखमी झाले आहेत.

आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे..MH14 LB 0544 क्रमांकाची महाराष्ट्र परिवहन महामंडळाची दोन महिन्यांपूर्वी नव्याने सुरू झालेली पुणे ते शेगाव ही शयनयान बस पुण्यावरून शेगावला येत होती.. रामनगर फाट्याजवळ खाजगी ट्रॅव्हल ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करीत असताना ट्रॅव्हलसमोर आलेला मालवाहू ट्रक अचानक लेन बदलून एसटी बसच्या समोर आला.. एसटी बस ओव्हरटेक करीत असल्याने वेगात होती..तोच साखरेची वाहतूक करीत असलेल्या ट्रकला मागील बाजूस धडकली..या भीषण अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

बस चालकाचे दोन्ही पाय मोडल्याचे सांगण्यात येत आहे..तर एक 25 वर्षीय प्रवाशी जागीच ठार झाला आहे..तो खामगाव तालुक्यातील रहिवाशी आहे.. 15 ते 16 प्रवाशी जखमी असून सर्वांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे..घटनास्थळी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील पोहचले असून ट्रक चालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला आहे..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp