Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीरस्त्यावर पथदिवे बंद असून महापालिकेच्या विद्युत विभागाकडून देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने...

रस्त्यावर पथदिवे बंद असून महापालिकेच्या विद्युत विभागाकडून देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने दिसत आहे

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४:- शहरातील मुख्य रस्त्यावर पथदीवे बंद असून काही पोलवर दिवेच नसल्याची परिस्थिती आहे. मंगरुळपीर मार्गावरील वरील खदान ते खडकी दरम्यान अनेक पथदिवे बंद असून यामुळे रात्री अपघात असून या परिसरात अंधार पसरला आहे. मनपाच्या विद्युत विभागाकडून देखभाल व दुरुस्तीअभावी हे चित्र असून या संदर्भात शहर अभियंता नीला वंजारी यांना ठाकरे गटाचे उपजिल्हा संघटक राहुल म्हस्के यांनी निवेदन दिले.

शहरातील सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या बार्शीटाकळी मार्गावरील खदान ते खडकी दरम्यान अनेक पथदिवे बंद पडलेले आहेत. या दिव्यांची महापालिकेच्या विद्युत विभागाकडून देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने या परिसरात अंधार पसरला आहे. या मार्गावर जागोजागी झाडे असल्याने पाच दिव्यांचा प्रकाश पाहिजे त्या प्रमाणात पडत नाही अशा स्थितीतही अनेक पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावर अपघात होत असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp