ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक 19 जुन सोमवार समीर शेख प्रतिनिधी शेगाव :- संत नगरीं शेगाव येथील पोलीस स्टेशन चा कारभार पोलीस निरिक्षक विलास पाटील यांनी हातात घेताच कारवाईचा बडगा उगारला असून गुटका कारवाई असो की वाहनांचा दंड असो आपल्या वेगळ्या शैलीने शेगावकरांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडत आहेत अशातच आता आपल्या आवडत्या नंबरची मागणी करून, नंबर प्लेटवर चित्र-विचित्र प्रकारे आकडे लिहिलेल्या वाहनांवर व सायलेंसर मध्ये बदल करून आवाज करणाऱ्या 45 वाहनांवर कारवाई करण्यात आली तसेच त्या वाहन चालका कडून दंड देखील आकारण्यात आला.

शेगाव शहरात अनेक वाहन चालक नवी गाडी घेतली की आपल्या आवडत्या नंबरची मागणी करून, नंबर प्लेटवर चित्र-विचित्र प्रकारे आकडे लिहितात. यासाठी वाहनधारक वाटेल तितकी रक्कम मोजायला तयार असतात. मात्र कायद्यानं अशा प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट बसवणं गुन्हा आहे. मात्र वाहन धारकांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. या फॅन्सी नंबर प्लेटमध्ये अनेक आकडे प्रसिद्ध आहेत. ४१४१ (दादा), २१२४ (शरद), ९१९१(बाबा), ४९१२(पवार), ७१७१ (नाना), ८०५५ (बाॅस) अशा प्रकारे इंग्रजी किंवा मराठी अक्षरे मोल्ड करून या नंबर प्लेटवर रेखाटली जात आहेत. मात्र, आता शेगाव शहरात अशा वाहन धारकांना चाप बसणार आहे. कारण शेगाव पोलिसांच्या विभागाने फॅन्सी नंबर प्लेट वाहन धारकांविरोधात धडक मोहीम सुरु करणार आहे

.

तर दुसरी कडे बुलेट ही शानदार सवारी असली तरी, आता फटाके फोडल्यासारखे आवाज करत गेलात, तर या बुलेट राजांविरोधात कारवाई होणार आहे. कानठळ्या बसवणाराआवाज काढणाऱ्या बुलेट विरोधात देखील शेगाव पोलिसांनी मोहीम हाती घेतलीय असून आज या बुलेट राजांना देखील दांडात्मक कारवाईला समोरे जावे लागले आहे

शेगाव येथे आज आज शहरात मोठ्या आवाजाची सायलेंसर लावलेल्या 4 बुलेट सह 45 वाहन चालकावर मोटर वाहन कायदयाचे अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असून 52000 दण्ड वसूल केला. शेगाव शहर पोलिसांनी आज शिवाजी महाराज चौकात केलेल्या नाकाबंदी दरम्यान 45 वहनावर मोटर वाहन कायद्या अंतर्गत कार्यवाही केली त्यात 4 बुलेट मोठ्या आवाजाच्या साइलेन्स बदल केलेल्या बुलेट, फैंसी नम्बर प्लेट, बिना नम्बर प्लेट, ,ट्रिपल सीट , ड्रायवहिंग लायसेंस, मुळ कागदपत्रे सोबत नसने या कार्यवाही करून वाहने पोलिस स्टेशन मध्ये जमा करन्यात आल्या असून पोलिस विभाग कडून आवाहन करण्यात येते की वाहतूक नियमांचे पालन करावे लहान मुलानी गाडी चलवू नये, पालकानीही त्याना गाड़ी चालविने करिता देवू नये, अन्यथा कारवाईला समोरे जावे लागणार असल्याचे आवाहन शेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!