Wednesday, May 22, 2024
Homeक्राईमलैंगिक चाळे करणाऱ्या अकोल्यातील त्या "टेबलटेनिस" कोचला न्यायालयाने सुनावली पाच वर्षाची शिक्षा

लैंगिक चाळे करणाऱ्या अकोल्यातील त्या “टेबलटेनिस” कोचला न्यायालयाने सुनावली पाच वर्षाची शिक्षा

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक ५ ऑगस्ट २०२३ :- शिक्षक म्हटले की आपण त्यांच्या कडे गुरु याचं नजरेने पाहतो मग ते कोणत्या शाळेतले शिक्षक असो की कोणचत्या खेळाचे कोच शिक्षक ते शिक्षकच असतात पण यातील काही मात्र याला काही मात्र अपवाद असून जीवन घडवणारे हेच गुरु आयुष्य उध्वस्त करून टाकतात अशीच एक घटना अकोला शहरात २०१८ मध्ये घडली होती या घटनेत नरादम कोचला न्यायाल्याने पाच वर्षाची शिक्षा ठोठावली असल्याने असले घाणेरडे कृत्य करणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

घटनेची हकीकत अशी की, सप्टेंबर २०१८ मध्ये फिर्यादीची मुलगी अंदाजे वय १२ वर्ष ही आरोपी महेंद्र चंद्रप्रकाश कोठारी यांचे टेबलटेनिस कोचिंग क्लासला खेळायला जायची त्याठीकाणी आरोपी हा तिला व्यायाम करण्याचे बहाण्याने व कोचिंग क्लासमध्ये ती एकटी असतांना विचित्र पध्दतिने स्पर्श करुन वारंवार विनयभंग करीत होता. पिडीत मुलीने ही बाब तिच्या आईल्या सांगीतल्या वरुन तिच्या आईने दि. ०५/१०/२०१८ रोजी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अकोला यांचे कडे फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादि वरुन वरील नमुद आरोपीच्या विरोधात पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला येथे गुन्हा क. ४३९/२०१८ भादवि कलम ३५४,३५४.अ पोक्सो कायदया अंतर्गत दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

दिनांक ०५.०८.२०२३ रोजी वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस.पी. गोगरकर यांनी विषेश पॉक्सो खटला क. २३/२०१९ मध्ये आरोपी महेंद्र चंद्रप्रकाश कोठारी, वय ५० वर्ष रा. एस.बी. आय. कॉलनी नं १, जठारपेठ, अकोला, जि. अकोला. यास पॉक्सो कायद्याचे कलम ९ व १० अंतर्गत दोषी ठरवुन ५ वर्षे सक्त मजुरी व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद तसेच भा.दं.वि. कलम ३५४,३५४ अ अंतर्गत दोषी ठरवुन ३ वर्षे सक्त मजुरी व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महीना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपीस दोन्ही शिक्षा सोबत भोगावयाच्या आहेत.

सदरहू प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता एकुण ०६ साक्षीदार तपासले. तसेच आरोपीने त्याचे बचावा करीता १ साक्षीदार तपासला सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन वि न्यायालयाने आरोपी महेंद्र चंद्रप्रकाश कोठारी यास दोषी ठरवुन वर नमुद शिक्षा सुनावली.

सदर प्रकरणात जिल्हा सरकारी वकील श्री. आर. आर. देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. त्यांना अॅड. सौ. मंगला पांडे यांनी सहकार्य केले, तसेच पो.स्टे. पैरवी अधिकारी ए. एस. आय. श्रीकांत गावंडे यांनी सहकार्य केले. तसेच तपास अधिकारी ए.पि. आय. सुनिल साळुंके यांनी तपास केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!