Thursday, May 23, 2024
Homeताज्या घडामोडीनिळ्या रंगाचे आधार कार्ड पाहिले आहे? कोणासाठी असते हे निळे आधार कार्ड...

निळ्या रंगाचे आधार कार्ड पाहिले आहे? कोणासाठी असते हे निळे आधार कार्ड जाणून घ्या

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १६ ऑक्टोंबर २०२३ :- आधार कार्ड हे आता प्रत्येकाची ओळख बनले आहे. भारतात आधार कार्डचा ओळखपत्र म्हणून वापर केला जातो. भारताच्या नागरिकांसाठी तो आता महत्त्वाचा ओळखीचा पुरावा बनला आहे. सर्व सरकारी कामांसाठी आता आधार कार्ड आवश्यक आहे. बँक खाते उघडायचे असो की कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे असो, एलपीजी सिलिंडरपासून ते मोबाईल सीमसाठी आधार कार्ड आता आवश्यक आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे की, देशात आधार कार्डचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक म्हणजेच निळे आधार कार्ड, तुम्ही कधी निळे आधार कार्ड पाहिले आहे का? हे ब्लू आधार कार्ड म्हणजे काय आणि कोणासाठी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.तुम्ही देखील घरबसल्या ब्लू आधार कार्ड बनवू शकता? आपल्यापैकी अनेकांना निळ्या आधार कार्डबद्दल माहिती नसेल. काय आहे हे निळे आधार कार्ड आधी जाणून घेऊया.

ब्लू आधार म्हणजे काय?
2018 मध्ये UIDAI ने लहान मुलांसाठी आधारची सुविधा सुरू केली. ज्याला ब्लू आधार किंवा बाल आधार असे म्हणतात. निळ्या रंगात येत असल्यामुळे त्याला ब्लू आधार असे नाव देण्यात आले आहे. निळ्या रंगाचे आधार कार्ड ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बनवले जाते. ते 5 वर्षानंतर अपडेट केले जाऊ शकते.

ब्लू आधारसाठी बायोमेट्रिकची आवश्यकता नाही
ब्लू आधार कार्डसाठी हे सामान्य आधार कार्डपेक्षा थोडे वेगळे असते. ब्लू आधार बनवण्यासाठी 5 वर्षांखालील मुलांसाठी बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत. त्यांच्या UID वर लोकसंख्याशास्त्रीय माहिती आणि त्यांच्या पालकांच्या UID शी जोडलेल्या छायाचित्रांवर आधारित प्रक्रिया केली जाते. ही मुले 5 आणि 15 वर्षांची झाल्यावर त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करावे लागते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!