अकोला न्यूज नेटवर्क दिनांक डेक्स दिनांक १६ ऑगस्ट २०२३ हिवरखेड प्रतिनिधी:- अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये हिवरखेड नजीकचे प्रसिद्ध पर्यटन आणि तीर्थक्षेत्र वारी हनुमान येथील श्री हनुमान मंदिर च्या पायऱ्यानजीकच्या राजन्या डोह मध्ये हिवरखेड येथील एक युवक पाण्यात बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती.
त्या घटनेची शाही वाळण्यापूर्वीच आज बुधवार दि.16 ऑगस्ट 2023 रोजी राजन्या डोहानजीक पुन्हा एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली आहे. सदर युवकाचे नाव राधेश्याम मधुकर इंगळे (वय अंदाजे 35) संग्रामपूर आहे अशी माहिती वारी पिंपरखेड चे माजी सरपंच शिवाजी पतींगे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.
सदर घटनास्थळ हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असून याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी सोनाळा पोलीस स्टेशनला कळविली असून सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. प्रेताला डोहा मधून बाहेर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदर युवकाचा मृत्यू कोण्या कारणास्तव झाला व कशा प्रकारे झाला याबाबत सध्या जास्त माहिती मिळू शकली नाही.
उपाययोजना अत्यावश्यक
बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून उपायोजना अत्यावश्यक झालेल्या असून वेळीच पावले उचलण्यात अत्यंत गरजेचे आहे कारण की सध्या पावसाळ्यामुळे सातपुडा पर्वतरांगा आणि मेळघाट चा परिसर नयन रम्य झालेला आहे. त्यामुळे हजारो पर्यटकांची आणि तीर्थयात्री यांची वारी येथे रेलचेल असते. नयनरम्य नदी आणि डोह पाहून युवकांना पोहण्याचा मोह आवरल्या जात नाही.
आणि डोहांच्या कपारी मध्ये जाऊन युवक मृत्यू पावतात. वारी येथील अकोला जिल्ह्याचे हद्दीतील कुख्यात मामा भाचा डोह आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतील राजन्याडोह या दोन जीवघेण्या डोहामध्ये आतापर्यंत जवळपास 500 युवकांचे बळी गेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्यापैकी अनेक मृतकांची नोंद अकोला जिल्ह्यातील हिवरखेड आणि बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस ठाण्यांमध्ये आहे. जी प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलीच नाहीत त्यांची संख्या आणखी जास्त असू शकते असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे सातत्याने या दोन्ही डोहांना सिमेंट काँक्रीट चे मोठमोठ्या ब्लॉक्सद्वारे बुजवून सौंदर्यीकरण करून आणि तरन तलाव, स्विमिंग पूल उभारावे अशी मागणी सातत्याने भाविकांकडून आणि पर्यटकांकडून केली जात आहे. परंतु शासनाला युवकांच्या जीवाशी काही घेणे देणे नसल्याचे सध्यातरी दिसत आहे.
अकोलाच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या बाबीची दखल घेऊन दहा लक्ष रुपये मंजूर करून मामा भाचा डोहाला नुकतेच काही दिवसांपूर्वी तारेचे कुंपण करून घेतले होते. परंतु सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे वाण धरणाचे फक्त दोन दरवाजे अतिशय कमी प्रमाणात उघडले असतानाही एकाच पाण्याचा प्रवाहात दहा लाख रुपयांचे कंपाऊंड पाण्यात वाहून गेले आहे.
प्रतिक्रिया
वारी हनुमान येथील दोन्ही डोहांमध्ये सातत्याने जीवित हानी होत असल्यामुळे दोन्ही डोहांना सिमेंट काँक्रीट चे मोठमोठ्या ब्लॉक्सद्वारे बुजवून सौंदर्यीकरण करून आणि तरन तलाव, स्विमिंग पूल उभारावे अशी मागणी अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी. जेणेकरून भविष्यात कोणाच्याही कुटुंबाच्या वंशाचा दिवा या डोहामध्ये विझणार नाही.
धिरज संतोष बजाज
सामाजिक कार्यकर्ता हिवरखेड