अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०७ ऑगस्ट २०२३ :-जिल्ह्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो पेहेराव केला होता त्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. अजित पवार यांनी दर्शन घेतल्यानंतर पारंपारिक डोक्यावर पगडी, अंगावर घोंगडी, हातात घुंगराची काठी घेत गड उतरला. यावेळी माध्यमांशी बोलताना (ANN NEWS) त्यांनी सांगितले की, सगळ्यांचे भल व्होवो, अस साकडं आपण खंडोबा देवाला घातलं आहे. जय मल्हारचे आशीर्वाद असेल की सगळं होत असे देखील अजित पवार म्हणाले. जेजुरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गडावर घोंगडी काठी आणि पारंपारिक पगडी घालून सत्कार केल्यानंतर कार्यक्रमाठिकाणी जाताना उपमुख्यमंत्री पवार यांनी हातातील काठी वाजवत गड उतरला. माध्यमांशी बोलता बोलता त्यांनी गड उतरला. त्यांच्या या पेहेरावांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अजित पवार त्यात खुलून दिसत होते.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले. आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने ते जेजुरीत आले आहेत. कार्यक्रमापूर्वी त्यांनी खंडेरायाचे दर्शन घेऊन श्री तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखडानुसार पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. दोन वेळा कार्यक्रमाची घोषणा होऊन ही काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर आज, सोमवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी जेजुरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. (AKOLA NEWS NETWORK )