Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीहिवरखेड नगरपरिषद होण्यासाठी एकही आक्षेप प्राप्त झाला नाही शासनाद्वारे कोणत्याही क्षणी हिवरखेड...

हिवरखेड नगरपरिषद होण्यासाठी एकही आक्षेप प्राप्त झाला नाही शासनाद्वारे कोणत्याही क्षणी हिवरखेड नगर परिषदेची अंतिम अधिसूचना निघू शकते

अकोला न्यूज नेटवर्क अब्दुल साकिब प्रतिनिधी हिवरखेड दिनांक २५ सप्टेंबर २०२३ :-हिवरखेड नगरपरिषद बाबत मागितलेल्या हरकती व आक्षेपाचा कालावधीत एकही आक्षेप न आल्यामुळे तसा अभिप्राय अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शासनाला पाठविला असून आता हिवरखेड नगरपरिषद निर्मितीतील सर्व विघ्न विघ्नहर्ताच्या साक्षीने दूर झाले आहेत व यामुळे हिवरखेड वासीयांमध्ये उत्साह संचारला आहे .गेल्या २३ वर्षापासूनच्या हिवरखेड वासियांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी शासनाकडून हिवरखेड नगरपरिषदेची अंतिम अधिसूचना निघून ग्रामपंचायत बरखास्त केली जाऊ शकते. हिवरखेड नागरपरिषदेची प्राथमिक उद्घोषणा दिनांक २६ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती त्यानंतर नियमांप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून हरकती व आक्षेप मागविण्यात आहे होते यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेला कालावधीत एकही आक्षेप प्राप्त न झाल्यामूळे तसा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यानिमित्ताने खऱ्या अर्थाने हिवरखेड वासीयांच्या एकजूटता दिसून आली आहे.व यामुळे हीवरखेड वासीयांमध्ये उत्साह संचारला आहे.

हिवरखेड या गावाची लोकसंख्या चाळीस 40 हजाराच्या वर असून क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तालुक्याचे ठिकाण असलेले तेल्हाऱ्या पेक्षा मोठे गाव म्हणून हिवरखेड चा नावलौकिक आहे मात्र विकास कामांच्या दृष्टिकोनातून हे गाव काही प्रमाणात मागास होते हिवरखेड येथे नगरपंचायत किंवा नगरपरिषद व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, पक्ष, व पत्रकार संघटनांकडून वारंवार विविध आंदोलने, निदर्शने करण्यात आली त्याची फलश्रुती म्हणून काही दिवसापूर्वी हिवरखेड नगरपंचायत तिची प्राथमिक उद्घोषणा शासनाकडून करण्यात आली होती मात्र त्यावर काही कारणास्तोवर स्थगनादेश आला होता त्यामुळे गावातील व्यापारी, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी एक महत्त्वपूर्ण सभा घेऊन आमदार प्रकाश भारसाकळे यांना हिवरखेड नगरपरिषद करण्यासाठी साकळे घातले होते हिवरखेड नगरपरिषद होण्यात काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आमदार भारसाकळे हिवरखेड नगरपरिषद करतील की नाही यावर गावात तर्क वितर्कांना पेव फुटला होता मात्र आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या प्रयत्नांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवरखेड नगर परिषदेची प्राथमिक उद्घोषणा करून पुढील कार्यवाही साठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता त्यावर नियमाप्रमाणे हरकती व आक्षेप मागविण्यात आले होते मात्र दिलेल्या कालावधीत एकही आक्षेप प्राप्त न झाल्यामुळे तसा अभिप्राय जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शासनाला पाठविला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp