अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०९ ऑगस्ट २०२३:-आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी एक अतिशय खास दिवस आहे, जो आपण १९४७ पासून दरवर्षी साजरा करतो. ठिकठिकाणी ध्वजारोहण केले जाते. लाडू- जिलेबी वाटल्या जातात आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी भारत देश 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. जर तुम्हीही यादिवशी तुम्ही एखाद्या खास फंक्शनला जाणार असाल तर त्यात वेगळे आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्ही काही आउटफिट्स ट्राय करू शकता.

तिरंगा साडी : भारतीय महिला-मुलींसाठी साडी हा प्रत्येक प्रसंगात सुरक्षित आणि खुलून दिसणारा उत्तम पोशाख मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही या दिवशी पारंपारिक पोशाख घालणार असाल तर साडी एक चांगला पर्याय आहे. स्वातंत्र्य दिनाचे खास वैशिष्ठ्य म्हणून वेगळे दिसण्यासाठी तुम्ही तिरंगी साडी परिधान करु शकता. एक साडी ज्यामध्ये आपल्या ध्वजाचे तीनही रंग म्हणजे भगवा, पांढरा आणि हिरवा असतो. अशा साड्या आजकाल सहज मिळतात. जर उपलब्ध नसतील तर या तीनपैकी कोणत्याही दोन रंगाची किंवा कोणत्याही एकाच रंगाची साडी नेसता येते. यानिमित्ताने साधी केशर किंवा हिरवी साडीही चांगली आणि स्टायलिश दिसेल. त्याचबरोबर तिरंगी बॉर्डर असलेली शुभ्र पांढरी साडीही खास लुक देऊन जाते.

तिरंगा स्कार्फ : जर साडी नेसताच येत नसेल किंवा साडी मिळण्यात काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या पांढऱ्या कुर्त्यासोबत तिरंगी दुपट्टा ओढणी घेऊन स्वांत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तुमची छाप पाडू शकता. पांढरे कुर्ते सहज मिळतात आणि ते तिरंग्याच्या दुपट्ट्यांशी इतके चांगले जुळतात आणि बेस्ट लुक देतात.

तिरंगी सूट : हा कदाचित सर्वात सोपा आणि वेगळा पर्याय आहे. यामध्ये तुम्ही ध्वजातील एका रंगाचा कुर्ता, दुसऱ्या रंगाची सलवार ध्वजाच्या तिसऱ्या रंगाचा दुपट्टा घेऊ शकता. यात हिरवी सलवार सफेद कुर्ता आणि भगव्या रंगाची ओढणी हमखास परफेक्ट लुक देते. या प्रकारच्या आउटफिटमध्ये तुमचा एकूण लुक खूप सुंदर दिसेल. (AKOLA NEWS NETWORK )


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!