Saturday, May 4, 2024
Homeदेशजिल्ह्यात राबवले जाणार मेरी मिट्टी मेरा देश अभियान

जिल्ह्यात राबवले जाणार मेरी मिट्टी मेरा देश अभियान

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०७ ऑगस्ट २०२३ :-भारताला स्वांतत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान(ANN NEWS)संपूर्ण देशात राबवले जात आहे, नाशिक जिल्ह्यात देखील जिल्हा परिषदेच्या वतीने दि. 09 ते 20 ऑगस्ट़ या कालावधीत राबवले जाणार आहे. यासंदर्भात तालुका स्तरावर सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी सर्व यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.या अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर व तालुका स्तरावर दि. 09 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधी दरम्यान कोणत्याही एका दिवशी पाच उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 1.शिलाफलक उभारणे 2. स्वातंत्र्य सैनिक, विरांना वंदन 3. पंचप्राण शपथ घेणे 4. ध्वजारोहणे कार्यक्रम 5. माती कलशामध्ये गोळा करणे- प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव टाकून हा मातीचा कलश दि. 27 ते 30 ऑगस्ट 2023 या दरम्यान मा. प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेवून जाण्यास एका युवकाची निवड करण्यात येणार आहे.

याचसोबत वसुधावंदनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या अमृत सरोवराचे ठिकाणी अथवा अमृत सरोवराचे परिसरात आयोजित करण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर अमृत सरोवर उपलब्ध नसल्यास इतर पाणी साठयांचे ठिकाणी, ग्रामपंचायत किंवा शाळा परिसरामध्ये(ANN NEWS)वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार वसुधावंदन या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर 75 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून संपूर्ण जिल्ह्यातल्या 1388 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 104100 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सदर वसुधावंदन उपक्रमामध्ये वृक्षलागवड करावयाची असल्याने वृक्षलागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येत असून भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर अमृत वाटिका तयार होणार, वसुधावंदन उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड व शिलाफलकम कामांची एकूण अंदाजपत्रकीय रक्कम 1,70,436 आहे. व त्यावर अपेक्षित मनुष्य दिवस निर्मिती 426 होणार. वसुधावंदन कार्यक्रमाकरीता वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, अशासकीय संस्थाच्या रोप वाटीका, कृषी विभागाच्या रोप वाटीका यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर सदर अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गावात सेल्फी पाँईट संख्या, शाळा महाविद्यालये यांच्यामार्फत गावातील घ्यावयाच्या स्पर्धा, चित्रकला, निंबध, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रभातफेरी, सायकल/मोटार सायकल रॅली इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने उपक्रम राबवण्यासाठी तालुका स्तरावर वेळापत्रक ठरवून देण्यात आले आहे.

  1. 09 व 10 ऑगस्ट 2023 रोजी अमृत सरोवर किंवा गावात उपलब्ध जलाशयाच्या ठिकाणी 75 देशी प्रजातींच्या रोपांची वृक्षरोपण करणे.
  2. 11 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे समन्वयाने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करणे.
  3. 12 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक/माध्यमिक शाळा, महाविद्यालय यांचेमार्फत प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  4. 13 ऑगस्ट 2023 रोजी गावात सेल्फी पाँईट तयार करून सेल्फी घेण्याचे अभियान राबविणे.
  5. 14 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर बाबींचा निपटारा करण्यासाठी मोहिम राबविणे.
  6. 15 ऑगस्ट 2023 रोजी ध्वजवंदन, राष्ट्रग्रीत व राज्यगीत गायन, विरांचा सन्मान करणे.
  7. 16 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत स्तरावर QR Code द्वारे कर वसुली मोहिम स्वरुपात राबविणे. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयात अभ्यागतांच्या वापरासाठी असलेली शौचालय स्वच्छता करण्याची विशेष मोहिम राबविणे.

मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानाचे सुक्ष्म नियोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार असून उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत, जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभाग घ्यावा.(AKOLA NEWS NETWORK )

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!