अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०७ ऑगस्ट २०२३ :-आज संपाचा सहावा दिवस आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर (ANN NEWS) आंदोलनासाठी (BEST contract workers Protest) बसले आहेत. संपावर गेलेल्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.असा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे.बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता बेस्टला कर्मचारी पुरवठा करणाऱ्या एसएमटी एटीपीएल असोसिएट कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. आपण केलेल्या संपामुळे बेस्ट प्रशासन आणि कंपनीची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ६ दिवसांपासून संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी ते आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. सरकारला मागण्यांबाबत अनेकदा पत्रव्यवहार केल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत आहेत असे सांगितले आहे.बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ७९६ बस गाडया रस्त्यावर धावल्या नाहीत. आज wet lease च्या एकूण ६०३ बस गाड्या बेस्ट उपक्रमाच्या चालकांकडून प्रवाशांच्या सेवेत आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी आज MSRTC च्या एकूण 122 बस गाडया बेस्ट उपक्रमाच्या सेवेत असणार आहेत. बस पुरवठादार व्यवसाय संस्थेविरुद्ध कंत्राटीच्या अटी आणि शर्तीप्रमाणे कारवाई करण्याचे आणि कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले की, ‘सरकारने यात हस्तक्षेप करुन तोडगा काढावा. कोणीही मुंबईकरांना वेठीस धरू शकत नाही. अनेक बस गाड्या आज रस्त्यावर नाहीत. याचा त्रास मुंबईकरांना होत आहे.’ सरकारने या संपावर ताबडतोब तोडगा काढवा अशी मागणी त्यांनी केली आहे.(AKOLA NEWS NETWORK )


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!