अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ :-यवतमाळ जिल्ह्यातील वीज पुरवठा दुरुस्ती करताना खांबावरच शॉक लागून वायरमनचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. विठ्ठल सिताराम आढाव असं मृतक खाजगी लाईनमॅन नाव आहे. खाजगी लाईनमन विठ्ठल अढाव हा काळी दौ इथल्या वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्रांगणातील विजेचे खांबावर काम करत होता.
अचानक विजप्रवाह सुरू झाल्यानं त्याला विजेचा जबर शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जाहिरातघटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, संतप्त नागरिकांनी कनिष्ठ अभियंता यांना जाब विचारला आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी कनिष्ठ अभियंता काकडे यांचेवर रोष व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.