Saturday, July 20, 2024
Homeब्रेकिंगरिल बनवण्यासाठी महिलेनं जीव टाकला धोक्यात, रेल्वे ट्रॅकवर उतरली आणि…

रिल बनवण्यासाठी महिलेनं जीव टाकला धोक्यात, रेल्वे ट्रॅकवर उतरली आणि…

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २५ जुलै :-आजकाल लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवताना दिसतात. लोक फोटो, व्हिडीओ बनवत ते इंटरनेटवर शेअर करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियाचं क्रेझ वाढत आहे. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करताना दिसतात. आपला जीवही धोक्यात घालायला कमी करत नाही. यामध्ये लहानापांसून मोठ्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका महिला रील बनवण्यासाठी चक्क रेल्वे ट्रॅकवर उतरली.

एक महिला सोशल मीडियासाठी रिल बनवत होती. रिलसाठी ती रेल्वे ट्रॅक उतरलेली दिसून आली. तरुणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताच पोलिसांनी याची दखल घेत कारवाई केली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी रील बनवत आहे. या रिलसाठी महिला थेट रेल्वे ट्रॅकवरच उतरली. जीवाची पर्वा न करता ती ‘अब तेरे बिन हम भी जी लेंगे’ या गाण्यावर रिल बनवत आहे. महिला डान्स करत असताना तिची मुलगी तिचा व्हिडिओ बनवत होती.

ही घटना आग्रा फोर्ट रेल्वे स्थानकातून समोर येत आहे. मीना सिंह असं महिलेचं नाव आहे. मीनाने तिचा व्हिडिओ यूट्यूब शॉट्सवर अपलोड केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आई-मुलीची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतलं. पुढच्या वेळी असे करणार नाही, असं आश्वासन दोघांनी दिल्यावर पोलिसांनी त्यांना जामीन मंजूर केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp