Saturday, May 4, 2024
Homeब्रेकिंगआणखी एका आत्महत्या आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना निराधार महिलेची राहत्या घरात गळफास...

आणखी एका आत्महत्या आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना निराधार महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

अकोला न्यूज नेटवर्क स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पतुर :- पातूर शहरातील समता नगर येथे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन एक महिला मृतावस्थेत असल्याचे आज स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. काल रात्रीच्या सुमारास पातूर शहरात एका सेवानिवृत्त शिक्षकाने गळफास घेतल्याची घडली होती त्यांचा अजून अंत्यसंस्कार देखील झाला नाही तोच पुन्हा शहरात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आज दि. 4/02/2024 रोजी सकाळी सुमारे 6 वाजताच्या दरम्यान पातूर शहरातील खानापूर रोडस्थीत समता नगर येथे एक महिला आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याने मृतावस्थेत असल्याचे तेथील स्थानिकांच्या निदर्शनास आले असता घटनेची माहीती त्यांनी पातूर पोलिसांना दीली.सदर माहितीवरून पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्राथमिक तपास केला असता मृतक महिलेचे नाव शांताबाई सुभाष भगत (वय 47) रा. समता नगर,पातूर असे असून सदर महिला निराधार आहे व तिला एक 20 वर्षीय मूकबधिर मुलगा असून बिकट परिस्थितीला कंटाळून या महिलेने गळफास घेतल्याचे बोलले जात असले तरीही आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

दरम्यान पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पातूर पोलीस कर्मचारी संबोधी इंगळे, मानकर मेजर,चालक अंभोरे मेजर,होमगार्ड जय चव्हाण यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली काढून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!