अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 20 जुलै – आज सकाळ पासूनच अनेकांच्या मोबाईल वर एक अलर्ट टाकले येणास सुरवात झाली आणी सगळ्याची तारंबळ उडाली कोणी म्हणे हा सायबर अट्याक आहे तर कोणी म्हणे आता मोबाईल फुटणार, तर कोणाच्या मते आता आपल्या मोबाईल मधील सर्वच डेटा डिलीट होणार असा तर्क वितर्क लावत होते या मागील नेमके कारण काय याचा शोध अकोला न्युज नेटवर्क ने घेतला असून खालील सत्य समोर आले.

तुम्ही मोबाईल वापरता का? हा प्रश्न आता कालबाह्य झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येताच्याच हातात, नव्हे तर नजरेपुढे मोबाईल असतो. स्मार्टफोन असो किंवा एखादा साधा फोन असो, मोबाईलला सध्या आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. अर्थात काही मंडळी अशीही आहेत जी आजही मोबाईल वापरत नाहीत. पण, तीसुद्धा फार कमी. तुमच्या हातात असणाऱ्या लहानशा मोबाईलमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी दडलेल्या असतात की जाणून तुम्हीही हैराण व्हाल.फिचर्स, अँप्स आणि बरंच काही दडलेलं असतं या मोबाईलमध्ये. पण, इतकं सगळं असूनही आसात सरकारनं सांगितलेलं फिचर नसल्यास तुमचा मोबाईल बंद पडणार आहे. सरकारकडूनच यासंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचं वाढलेलं प्रमाण पाहता सरकारकडून मोबाईल कंपन्यांना इमर्जन्सी अलर्ट हे फिचर देणं अनिवार्य केलं आहे. शासनाच्या या आदेशानंतरही जर एखाद्या कंपनीकडून त्यांच्या मोबाईल प्रोडक्टमध्ये हे फिचर देण्यात आलं नाही तर त्या कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. किंबहुना हे फिचर नसणाऱ्या स्मार्टफोन्सची विक्रीच भारतात बंद करण्यात येणार आहे. यासाठी कंपन्यांकडे जवळपास 6 महिन्यांचा वेळ आहे. येत्या काळात मोबाईल कंपन्यांनी हे फिचर असणाऱ्याच मोबाईलची विक्री करावी असं सांगत जुन्या स्मार्टफोनमध्ये यासंबंधीचं सॉफ्टवेअर अपडेट करत हे फिचर उपलब्ध करून द्यावं अशा सूचनाही केंद्रानं केल्या आहेत. असं न केल्यास मात्र तो स्मार्टफोन बंद करण्यात येईल.

तुमच्या हितासाठीच सरकारचं पाऊल…

मागील काही महिन्यांपासून भारतासह जगभरात नैसर्गिक आपत्तींचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. भारतालाही भूकंपाचे हादरे सातत्यानं जाणवले आहेत. याच धर्तीवर अनेक राष्ट्रांमध्ये स्मार्टफोनमधून नागरिकांना सतर्क केलं जातं. पण, भारतात मात्र अद्यापही मोबाईलमध्ये ही तरतूद करण्यात आलेली नाही. ज्या मोबाईलमध्ये ही सुविधा आहे ती सक्रिय नाही अशीच भारतातील परिस्थितीत. त्यामुळं आणि विशेष म्हणजे भूकंपांच्या धर्तीवर सावधगिरीनं पावलं उचलण्याच्या दृष्टीनं सरकारनं ही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

अलर्ट एक, फायदे अनेक!

मोबाईलमध्ये हे फिचर Active होताच त्याचे अनेक फायदे होणार आहेत. कारण, इथं तुम्हाला भूकंपाची माहिती आधीच मिळू शकणार आहे. फक्त भूकंप नव्हे, तर त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतरही नैसर्गिक आपत्तींची पूर्वसुचना हे फिचर तुम्हाला देणार आहे. या फिचरमधून तुमच्या मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून पूर, भूकंप, अतीवृष्टी याबाबतच्या सूचना येतील. शेतकऱ्यांना या फिचरचा फायदा अवकाळी आणि अतीवृष्टीपासून वाचण्यासाठी करता येऊ शकतो ही बाबही इथं लक्षात घेणं महत्त्वाचं.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!