अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ३१ जुलै२०२३ :-भारताची तिसरी चंद्रयान-3 ( Chandrayaan-3 ) आता चंद्राच्या कक्षेत पोहण्याच्यासाठी थोडाच अवधी शिल्लक राहीला आहे. इस्रोने येत्या एक ऑगस्ट रोजी यानाचे थ्रस्टर्स सुरु करण्याची योजना बनविली आहे. मध्यरात्री ट्रान्स लूनर इंजेक्शनची प्रक्रीया सुरु होण्यासाठी 28 ते 31 मिनिटांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. चंद्रयान-3 येत्या 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. हे कार्य यशस्वी झाल्यास भारत अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथा देश ठरणार आहे.
चंद्रयान – 3 थ्रस्टर्सना सुरु करून त्याचा वेग वाढविण्याची प्रक्रीया पृथ्वीपासूनच्या त्याच्या सर्वात कमी अंतराच्या वेळी यासाठी केली जाते कारण तेव्हा त्याचा वेग सर्वात जास्त असतो. चंद्रयान-3 सध्या 1 किमी/ सेंकद आणि 10.3 किमी सेंकदाच्या दरम्यान वेगाने अंडाकार कक्षाने पृथ्वीभोवती फिरत आहे. चंद्रयान-3 चा वेग वाढविताना त्याचा वेग जादा असण्याची गरज असते. दुसरी गोष्ट अशी की चंद्रच्या कक्षेत त्याला ढकलताना त्याचा कोन बदलणे गरजेचे आहे. चंद्रयान-3 ला पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असताना त्याची दिशा बदलणे गरजेचे आहे.ट्रांस-लूनर इंजेक्शनसाठी पहिल्यापासून तयार आणि लोड केलेल्या कमांडचा वापर केला जाईल. थ्रस्टर्स सुरु करण्याची प्रक्रीया पाच ते सहा तास आधीच सुरु केली जाईल. त्यामुळे चंद्रयान-3 चा कोन बदलण्यास मदत मिळणार आहे. थ्रस्टर्सच्या फायरिंगमुळे यानाचा वेग मिळेल. चंद्रयान – 3 सरासरी 1.2 लाख किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सुमारे 51 तासांचा वेळ लागत असतो. पृथ्वी आणि चंद्रादरम्यान 3.8 लाख किमीचे अंतर आहे.
चंद्र जुलै महिन्याच्या काळात पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे जुलै महिन्याच चंद्रावर जाण्याच्या अंतराळ मोहिमा आखल्या जातात. चंद्राच्या कक्षाजवळ पोहचणे केवळ चंद्रयान-3 मोहिमेचा एक भाग आहे. चंद्रयान-3 मोहिमेची खरी कसोटी यान चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर सुरु होणार आहे. एकदा चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहचले की यानाला 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत स्थापित करावे लागेल. इस्रोने प्रोपल्शन मॉड्यूलला 17 ऑगस्ट लॅंडींग मॉड्यूलपासून वेगळे करण्याची वेळ निश्चित केले जाईल. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 ला चंद्रयानवर लॅंडींग केले जाईल.